व्हीएसआरएस न्युज -राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘होल्ड’ कायम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडी’च्या अंतर्गत प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ केला आहे.
त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर ‘डेव्हलपमेंट ॲन्ड डेडिकेशन’ असा अजेंडा ठेवण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या आयुक्तपदी राहुल महिवाल यांच्याजागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज (२७ जून) ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे.
Discussion about this post