व्हीएसआरएस न्युज आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.
अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोरदार कंबर कसली.
राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती
- राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – 24 मार्च)
- निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
- प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
- बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
- प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
- संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
- रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
- वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा
Discussion about this post