व्हीएसआरएस न्युज-नव्या संसद भवनात स्थापित करण्यात आलेल्या सेंगोलवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित केल्यानंतर दिल्लीत हा वाद चांगलाच वाढला आहे.
खासदार चौधरी यांनी संसदेतून सेंगोल हटवून त्याजागी संविधान ठेवण्याची मागणी केली आहे. भाजपच्या सरकारने संसद भवनात अध्यक्ष बसतात, त्याठिकाणी सेंगोल स्थापित केला आहे. सेंगोलचा हिंदीतील अर्थ राजदंड असा आहे. म्हणजेच राजाची छडी (राजा का डंडा). आता देश संविधानाने चालणार की, राजाच्या छडीने, असा सवाल चौधरींनी उपस्थित केला.
लोकशाही वाचवायची असेल तर संसद भवनातून सेंगोल हटवायला हवा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. यावर बोलताना सपाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनीही त्यांचे समर्थन केले. सेंगोल स्थापित केला तेव्हा पंतप्रधानांनी प्रमाण केला होता. पण शपथ घेताना ते विसरले. याची आठवण करून देण्यासाठी आमच्या खासदारांनी पत्र लिहिले.
सेंगोल हा शब्द सेम्मई या तमिळ शब्दापासून आला आहे. सेंगोल हा एक राजदंड असतो. चांदीच्या सेंगोलवर सोन्याची मुलामा असतो. त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी महाराज आहेत. संसदेत स्थापित सेंगोल पाच फूट लांब आहे. काही विशिष्ट वेळीच सेंगोल संसदेतून बाहेर आणला जातो. त्याचे महत्व जनतेला कळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. 1947 नंतर पहिल्यांदाच सेंगोलला संसदेत स्थापित करण्यात आले आहे.
Discussion about this post