व्हीएसआरएस न्युज –जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नागरिकांमध्ये जनजागृती केली. अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्याते विल्यम फाऊंडेशनचे विल्यम साळवी यांनी व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजीव नगरकर यांनी मनाची व्यायामशाळा या विषयावर मार्गदर्शन केले.
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी वाढती व्यसनाधिनता व त्याचे युवकांवर होत असलेले दुष्परीणाम या विषयावर मार्गदर्शन केले. पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी व्यसनाचे दुष्परीणाम या विषयाची दाहकता उलगडून सांगितली.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी अमली पदार्थ बाबतच्या कायदयातील तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमासाठी शहरातील स्थानिक झोपडपट्टीतील युवक, विदयार्थी व पालक उपस्थित होते.
Discussion about this post