व्हीएसआरएस न्युज पिंपरी एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरानी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा.
प्रथम वडाला सूत लावावे. आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ( विड्याची पाने दोन, त्यावर सुटे पैसे व एक सुपारी) ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना म्हणजे आपल्या उपाध्यायांना नमस्कार करुन पाटावर बसावे. नंतर पूजेला सुरुवात करावी. पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे. चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
महिलांसाठी ऑनलाईन वटसावित्री स्पर्धेचे आयोजन- ॲड सुप्रिया केंदळे
पारंपारिक रूढी आणि धर्मानुसार स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि साताजन्माची गाठ पक्की रहावी म्हणून वटसावित्री ची पूजा करतात !!
ह्याच पूजेला स्पर्धेचं स्वरूप देत सौ. सुप्रिया उत्तम केंदळे ह्यांनी २४ व २५ जून रोजी ऑनलाइन वटसावित्री स्पर्धेचे आयोजन केले आहे.!!
चला तर मग ह्या वर्षीची वटसावित्री थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करूया आणि स्पर्धेत भाग घेऊया!!
स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला २४ व २५ जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत वटपौर्णिमेची पूजा करतानाचा विडिओ ७०६६१५४४४४ ह्या Whatsapp नंबर वर पाठवायचा आहे.
तुमची वेशभूषा,पूजा थाळी ची सजावट आणि उखाण्यातील नावीन्य ह्या विविध पैलूंवर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
आणि हो…
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी असणार आहे आणि तसेच सहभागी भगिनींना सुद्धा बक्षिसे देण्यात येणार आहे…
चला तर मग वाटपौर्णिमेच्या तयारीला लागा…
अधिक माहितीसाठी ७०६६१५४४४४ ह्या क्रमांकावर संपर्क साधा!!
Discussion about this post