व्हीएसआरएस न्युज पिंपरी दि. ३१,
भारताचे पहिले ग्रहमंत्री, भारतरत्न लोहपुरूष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, पोलादी स्त्री,भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खराळवाडी येथील ज्येष्ठ नागरीक हॅाल मध्ये काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते या दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रंसगी प्रसिध्द लेखिका, वक्त्या व विचारवंत प्रा.शैलजा सांगळे यांचे
“स्त्रीशक्ती-दिव्यशक्ती” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले या प्रसंगी त्या म्हणाल्या, “भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या जातीधर्माच्या,रूढी,परंपरा चालिरिती असलेल्या देशाला एका महिलेने १५ वर्षे नेतृत्व देणे सोपे नव्हते त्यांच्या कारकिर्दीत सुवर्णअक्षरांनी लिहावे असा काम म्हणजे बांग्लादेशाला स्वातंत्र्य युध्दात केलेले सहकार्य या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष त्यांनी वेधले त्यामुळे त्यांना १९९९ साली त्यांना “विमेन ॲाफ मिलेनियम” या बीबीसी पोल मध्ये नाव मिळाले तर २०२० च्या टाईम्स ग्रूप सर्व्हे मध्ये त्यांना गेल्या शतकातील १०० शक्तीशाली महिलांमध्ये त्यांचे नाव होते. स्त्री शक्ती हि दिव्य शक्ती होते ती तिच्या गुणांमुळेच धैर्य, संयम, चिकाटी, सहनशीलता, या गुणांमुळे ती संकटांना डगमगत नाही व हे गुण आजच्या स्त्री यांनी इंदिरांजी कडून घ्यावेत”
या प्रसंगी काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रा.शैलजा सांगळे, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे
अध्यक्ष आनंदराव फडतरे, काँग्रेस नेत्या सौ.छायाताई देसले, एस सी विभागाचे शहर कार्याध्यक्ष विजय ओव्हाळ, संजीव झोपे आदि व मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
Discussion about this post