Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी परिसरात भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. कार चालकाने महिलेला रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले.
या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव रेखा जीवराम चौधरी असे आहे. अपघातानंतर गाडीचा चालक विनय विलास नाईकरे यांनी स्वत: अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात नेऊन तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. अपघातग्रस्त महिलेच्या पतीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चालक विनय विलास नाईकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आरोपी विनय नाईकरे याचे वडील पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. आणि ते पोलीस हवालदार म्हणून ज्या पोलीसठाण्यात कार्यरत आहेत त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
या प्रकरणी आरोपीचे वडील पोलीस असल्याने आम्ही गुन्हा नोंदविण्यास विलंब केला नाही. अपघातग्रस्त महिलेचा पती तिच्यावर उपचार सुरू असल्यामुळे रुग्णालयात गुंतला असल्याने त्याने आज तक्रार दिल्यानंतर दाखल करून घेतली. आणि गुन्हा दाखल केला अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली.
Discussion about this post