व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ओ बी सी महिला शहराध्यक्ष पदी सौ. सारिकाताई पवार यांची निवड करण्यात आली. त्या तसे निवडी चे पत्र देण्यात आले.
सारिकाताई पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जेष्ठ नेते व माजी मंत्री . एकनाथराव खडसे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. शहरात प्रत्येक बूथ वर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, संजय वाबळे (नगरसेवक), प्रसिध्द गायक आनंद शिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक योगेश मोरे, हरिप्रसाद वाबळे, प्रशांत बडगुजर, दीपक चव्हाण, महेंद्र पवार, अनिकेत उबाळे उपस्थित होते.