व्हीएसआरएस न्युज -टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.
यापूर्वी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी भारताने दुसऱ्यांदा या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, टी२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने केला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच इंग्लंडने २००९ आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली होती.
शनिवारी झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या. त्यामुळ भारताने ७ धावांनी विजय मिळवला.
ज्या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या, त्यांना एकसमान 6.54 कोटी रुपये (787,500 डॉलर) देण्यात येतील. म्हणजे अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या टीमला सुद्धा चांगला पैसा मिळेल. T20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी एकूण 20 टीम सहभागी झाल्या होत्या. एकूणच आयसीसीकडून यावेळी प्रत्येक टीमला काही ना काही रक्कम देण्यात आली आहे. सुपर-8 (दुसरा राऊंड) पुढे जाऊ न शकणाऱ्या टीम्सना प्रत्येकी 382,500 डॉलर (जवळपास 3.17 कोटी रुपये) मिळणार आहेत.
नऊ ते 12 व्या स्थानादरम्यान ज्या टीम्स आहेत, त्यांना प्रत्येकी 247,500 डॉलर (जवळपास 20.57 कोटी रुपये) मिळणार आहेत. 13 व्या ते 20 व्या स्थाना दरम्यानच्या टीम्सना प्रत्येकी 225,000 डॉलर (जवळपास 1.87 कोटी रुपये) मिळणार आहेत. T20 वर्ल्डकपसाठी एकूण 11.25 मिलियन डॉलर (जवळपास 93.51 कोटी रुपये) प्राइज मनी निश्चित करण्यात आली आहे.
T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या टीमला 20.36 कोटी रुपये (2.45 मिलियन डॉलर) मिळणार आहेत. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा विजेत्या टीमला इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. फायनल हरणाऱ्या टीमला म्हणजे उपविजेत्याला 10.64 कोटी रुपये (1.28 मिलियन डॉलर) मिळणार आहेत.
Discussion about this post