व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार तसेच आमदार पुत्र आणि कार्यकर्ते यांनी केलेली मारहाण प्रकरणातील पसार आरोपींची पिंपरी चिंचवड पोलीसांनी धरपकड सुरु केली आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि स्टाफ यांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. पथकाने हि कारवाई मंगळवार (ता. 18) रोजी केली आहे.
साजिद मेहबुब शेख (वय 21 वर्ष रा. अल्फाईन गार्डन सोसायटी, बिल्डिंग नं. फ्लॅट नं. 204, गणेश मंदिरा जवळ, कृष्णा नगर, म्हेत्रे वस्ती, चिखली) आणि रोहीत अशोक कुसाळकर (वय- 20 वर्ष रा. पवार चाळ, राम मंदिराच्या पाठीमागे, रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि पोलीस नाईक संदिप पाटील, पोलीस शिपाई मगर, गोरगोटे हे निगडीपोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि पोलीस नाईक संदिप पाटील यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील फरार आरोपी पैकी दोन आरोपी है। बर्ड व्हॅली गार्डन समोर येणार आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
आरोपींची वैदकिय तपासणी करून त्यांना पुढील तपास कामी निगडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस नाईक संदिप पाटील, पोलीस शिपाई मगर, पोलीस शिपाई गारगोटे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
पिंपरी विधान सभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार (ता. 12) रोजी गोळीबार झाला होता. आमदारावर दिवसा डवळ्या झालेल्या गोळीबारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलीसांनी गोळीबार केलेला आरोपी तानाजी पवार याला तत्काळ अटक केली. आमदारांनी जनतेला शांतता रायण्याचे आवाहन केले.
मात्र, पोलीसांनी गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे केवळ मोकळ्या काडतुसच्या पुंगळ्या आणि पिस्टल शिवाय कोणतेही गोळीबाराचे निशाण आले नाही. त्यामुळे पोलीस देखील काही काळ चक्रावून गेले होते. दरम्यान, आमदार साहेबांनी दोन कामगारांना कामावर घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या त्या मॅनेजरला शिवीगाळ केली असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लीप च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी भेट घेतली. तेथील सीसी फुटेज तपासले असता कचरा वेचक कर्मचारी यांना मारहाण केली असल्याचे स्पष्ट झाले.
मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सुरवातीला तक्रार दाखल न झाल्याने कोणावरही पोलीसांनी कारवाई केली नव्हती.
परंतु तक्रार दाखल झाल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या सुचनाप्रमाणे पोलीसांनी आमदार पुत्रासह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व आरोपी पसार झाले होते.
पोलीसांनी आरोपींची धरपकड सुरु केली आहे. मात्र, अद्याप आमदार पुत्र आरोपी सिद्धार्थ बनसोडे हा पसार आहे. आरोपी सिद्धार्थ बनसोडे याचा फोन बंद असल्याने त्याचे लोकेशन तपास कामी अडचणी येत असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे. मात्र, पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पोलीसांच्या हाती लागणार असल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.