व्हीएसआरएस न्युज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान आज सोमवारी (दि.१९) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
भाजपाकडून महापालिकेच्या सभापती पदासाठी खालीलप्रमाणे अर्ज दाखल..
विधी समिती- स्विनल म्हेत्रे,
महिला व बालकल्याण समिती – चंदा लोखंडे,
शहर सुधारणा समिती – सोनाली गव्हाणे,
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती – उत्तम केंदळे,
शिक्षण समिती- मनिषा पवार यांनी
यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत.