व्हीएसआरएस न्युज बुलढाणा : काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आज (15 ऑगस्ट) पासून दोन दिवसीय बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता ते सिंदखेडराजा येथे पोहचणार.
त्यानंतर साखरखेर्डा येथून 5:30 वाजता चिखलीत त्यांची भेट आहे. संध्याकाळी 7 वाजता सावरगाव डुकरे येथे आणि रात्री 8 वाजता मूर्ती येथे जाणार आहेत. तेथुन ते बुलडाणा येथे दाखल होतील. बुलडाणा शहरात त्यांचा मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट ला रोजी सकाळी 8:30 वाजता ते नांदुरा येथे मार्गस्थ होतील. 10 वाजता जळगाव जामोद आणि दीड तासानंतर सोनाळा येथे वासनिक दौरा करतील. दुपारी 1 वाजता ते शेगाव येथे सांत्वनपर भेट देणार आहेत तर दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते नागपूरला प्रयाण करतील. अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी दिली आहे.
Discussion about this post