व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वात शहरात पुणे मेट्रोच्या विरोधात निर्णयकारक आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, युवा मोर्चा सरचिटणीस जवाहर ढोरे,दिनेश यादव, तेजस्विनी कदम, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, अतुल बोराटे, सन्नी बारणे, सुमीत घाटे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
मेट्रोच्या खांबावर “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे स्टिकर चिकटवण्यात आले. तुम्ही नाव बदल करण्यात चालढकल करत असाल, तर आम्हाला कळवा आम्ही ते बदलवून घेऊ, पण खपवून घेणार नाही.
आम्ही सर्व पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आहोत, की आज आपण आपले अस्तित्व व अस्मितेची लढाई मजबुत करून पिंपरी चिंचवड शहराच्या विरोधकांना दाखवून देऊया की जर विषय शहराचा असेल तर आम्ही मिळून मैदानात उतरू व आमचा हक्क मिळवून घेऊ.
ही तर सुरुवात आहे, जर यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव करण्यात नाही आले तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत.
Discussion about this post