व्हीएसआरएस न्युज या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
तर, चेन्नईच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघांना आता प्लेऑफ शर्यतीत प्रवेश करण्यासाठी आपले उर्वरित दोन सामने जिंकणे गरजेचे आहे. दोन्ही संघांचे 12 सामन्यात प्रत्येकी 10 गुण आहेत.
दुसरीकडे, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रविवारी पंजाब किंग्जवर सहा धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबीच्या विजयाने पंजाब किंग्जचे अंतिम चार संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तथापि, इतर सर्व निकाल जर त्यांच्या बाजूने लागले आणि त्यांनी CSK विरुद्ध शेवटचा सामना जिंकला तर PBKS अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
Discussion about this post