व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -कोरोना संसर्ग झालेले १४६ रुग्ण मंगळवारी (ता. १५) शहरात आढळले. आतापर्यंत तीन लाख ५७ हजार ३७३ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ५५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत तीन लाख ५१ हजार ६२९ जण बरे झाले असून चार हजार ६१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११९ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एक हजार ७४४ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण एक हजार ८६३ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३३ लाख ६४ हजार २७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज ३२० घरांतील एक हजार २७१ नागरिकांची तपासणी केली. सध्या ६५ मेजर व ८९९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
Discussion about this post