व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार, श्रमिकांची नगरी आहे. या शहरात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नागरिक वास्तव्यास आले आहे. शहरात सुमारे 30 ते 32 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता त्यांना सोई-सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यात जीवनशैलीतील बदलांमुळे नागरिकांना गंभीर आजारांची लागण होत आहे.
विशेषता कर्करोग या जीवघेण्या आजारावर वेळेवर उपचार घेतले नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून रुग्णास चांगले व वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे म्हणून महानगरपालिकेने कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्करोग रुग्णालयासाठी लागणारी जमीन, इमारत, आर्थिक तरतूद आणि अपुरे मनुष्यबळ या सर्व बाबी विचारात घेता, महापालिकेला कॅन्सर रुग्णालय उभारणे संयुक्तिक होणार नाही. तर त्यांनी पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर हे रुग्णालय उभारून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिल्यास त्यांचा गोरगरिबांना रुग्णांना फायदा होईल व अल्प दरात सेवा मिळेल, असेही आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. याबाबत बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
Discussion about this post