व्हीएसआरएस मराठी न्युज -प्रवीण दरेकर यांनी 2013 ते 2020 या कार्यकाळात 2 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. सहकार विभागाच्या चौकशीत हे बाहेर आले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांची आमदारकी रद्द करून त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.
मुंबई बँकेत (Mumbai Bank Scam) ते मजूर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तर विधानभवनात आमदार बनताना. बिझनेसमन म्हणून त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांना पाठीशी घातले. या घटनेची जबाबदारी घेऊन नैतिकता असेल तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली आहे.
Discussion about this post