व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर भाजी विक्रेते व ईतर किरकोळ वस्तू साहित्य विकणारे
मोठया प्रमाणात बसत असल्याने त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.भाजी मंडई चा प्रश्न तात्पुरता सुटलेला दिसून येत असला तरी त्या भाजी मंडई समोरील रस्ता भाजी विक्रेते व इतर वस्तू विकणाऱ्यांच्या विळख्यात मात्र सापडलेला दिसतो.यामुळे खंडोबा रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी चे चित्र सातत्याने दिसत आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी भाजीपाला घेऊन येणारी छोटी मोठी वाहने रस्त्यावरच उभी असतात.त्यामुळे त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच रुग्णवाहिकेला त्या रस्त्यावरील असणाऱ्या किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे अडथळा आल्याचे दिसून येते. गंभीर रुग्णास उपचारासाठी रुग्णालयातुन बाहेर नेण्यासाठी किंवा रुग्णालयात आणण्यासाठी विलंब झाल्यास या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार?असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
वृत्तपत्रात वृत्त छापून आले,वृत्त प्रसारित झाले की नगरपालिकेची काही दिवस कारवाई होत असताना दिसते.विशेष बाब म्हणजे नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर च असलेल्या या रस्त्यांवर बसलेल्या भाजी विक्रेते व इतर वस्तू विकणारे कायमस्वरूपी येथे बसू नये म्हणून कारवाई होण्याची गरज असताना ती होताना दिसत नाही.रस्त्यावर एक रुग्णवाहिका दिसते रुग्णवाहिकेच्या अवतीभवती भाजी विक्रते ही बसलेले दिसून येतात.सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रोज नगरपालिका दुपारनंतर तिथे कारवाईत सातत्य ठेवणार असे एका वृत्तात छापून ही आले होते.याचे ही नगरपालिकेला स्मरण राहिल्याचे दिसत नाही.
Discussion about this post