व्हीएसआरएस मराठी न्युज -माजी आमदार विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
यामुळे त्यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.
Discussion about this post