व्हीएसआरएस मराठी न्युज -पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले होते. ते म्हणाले की, “काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध कलाकार सिद्धू मुसे वाला यांची हत्या करण्यात आल्याचे ऐकून मला धक्का बसला.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची आठवड्याभरापूर्वी हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांचे कुटुंबीय पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मुसाया गावात राहतात. त्याच्या भेटीला काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंजाबमध्ये हजर झाले आहेत.
त्यांच्या हत्येची घटना खूपच दुखद आहे. मुसे वाला यांच्या जगभरातील चाहत्यांना तसेच त्यांच्या परिवाराविषयी मी संवेदना व्यक्त करतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. .
काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये शांतता राखणे ही आप सरकारची बाब नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले .
Discussion about this post