व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.७ मा.सर्वोच्च न्यायालयाने SPL क्र.१९७५६/२०२१ मधील दि.४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरन राज्य निवडणूक आयोगाच्या दि.१०/०३/२०२२ रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून
निवडणूकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यास अनुसरून प्रारूप रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग ,महाराष्ट्र यांच्या पत्रा द्वारे आळंदी नगरपरिषदेने जाहीर केला होता.
१० मे ते १४ मे या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना करता येणार होत्या.त्यात ८ हरकती घेण्यात आल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावर सुनावणी घेण्यात आल्या. त्यावर अभिप्राय नोंदवून तो अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस ६ जून पर्यंत मान्यता देण्यात आली.
आज अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली.प्रभाग रचना( देण्यात आलेला नकाशा) जैसे थे तैसे
आहे. स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, वृत्तपत्रात व नगरपरिषदेच्या वेबसाईटवर, तहसीलदार कार्यालयात, प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे.अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
Discussion about this post