व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा-सुविधा आणि औषधोपचाराकरीता आता शासन दराप्रमाणे आकारणी केली जाणार आहे.
महापालिकेने यासाठी धोरण निश्चित केले आहे. त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर हे धोरण लागू केले जाणार आहे. याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
शासन दरानुसार निर्धारित केलेले दर महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी लागू करणे तसेच यापुढे वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणार्या सुधारित दरानुसार कार्यवाही करण्यासाठी मान्यता घेण्याचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना असणार आहेत. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणार्या केशरी रेशनकार्डधारक नागरिकांना मोफत सुविधा दिली जाईल.
मात्र इतर केशरी रेशनकार्डधारक नागरिकांना देण्यात येत असलेल्या मोफत सुविधेबाबतचा आदेश निरस्त करण्यास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.
Discussion about this post