व्हीएसआरएस मराठी न्युज -शालेय वाहनांचे पासिंग आता वाहनचालकांना शनिवारी आणि रविवारी सरकारी सुटीच्या दिवशीसुध्दा करता येणार आहे. त्याकरिता आरटीओकडून शनिवारी आणि रविवारी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक वाहनचालक गाडी पासिंग न करताच शालेय विद्यार्थी वाहतूक पुरवत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय वाहनाचे तातडीने पासिंग करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले असून, आरटीओकडून सुटीच्या दिवशीसुध्दा शालेय वाहनांचे पासिंग करून देण्यात येणार आहे. तसेच, विनापासिंग शालेय वाहन सापडल्यास या वाहनावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post