व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहरातील पाणी प्रश्नांवर आज आम आदमी पार्टी तर्फे आंबेडकर पुतळा पिंपरी येथे आंदोलन घेण्यात आले.
धरणात मुबलक पाणी असताना शहरातील लोकांना दिवसाआड पाणी, अवेळी पाणी, टँकर माफिया , अनियमित पाणी, रखडलेली पाण्याची अमृत योजना या विषावर हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी बोलताना पक्षाच्या शहर महिला अध्यक्ष स्मिता पवार म्हणाल्या की ” अवेळी पहाटे ३ वाजता पाणी दिले जाते, दिवसाआड पाणी दिले जाते याने महिलांचे हाल होतात”. शहर प्रवक्ते कपिल मोरे म्हणाले की ” स्मार्ट सिटी असलेल्या शहरात दिवसा पाणी फक्त अपुराया उपसा व पंपिंग क्षमता मुले असणे हे शहराच्या राज्यकरत्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.”
उपाध्यक्ष महेश बिराजदार म्हणाले की “हे आंदोलन आज पुरते मर्यादित नसून, हे साखळी आंदोलन असणार आहे व गराज पडली तर महापालिका समोर ठीया केले जाईल.”शहराच्या लोकांनी आता आपले मतदान बदलून आम् आदमी पार्टीला मतदान केल्याशिवाय ही परिस्तिथी बदलणार नाही” असे मत शहराध्यक्ष अनुपशर्मा यांनी मांडले, तर पाणी प्रश्नात असलेल्या भ्रष्टाचार याकडे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी लक्ष वेधले.
यावेळी पक्षाचे वरील पदाधिकारी समवेत पुणे जिल्हा सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विंग अध्यक्ष दीपक श्रीवास्तव. भोसरी विधानसभा अध्यक्ष मुकेश जाधव प्रवक्ते रशीद भाई अत्तर, स्वापणील जेवले, ब्रह्मानंद जाधव, याल्लाप वलदोर, भिसे साहेब, गोपाळकृष्ण पिल्लई, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post