व्हीएसआरएस मराठी न्युज -*निगडी प्राधिकरणात आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न.
आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे निगडी प्राधिकरणा येथे उद्घाटन आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले . के.टी.बारापात्रे यांनी जनसंपर्कासाठी हे ऑफिस उघडले आहे. या प्रसंगी अर्जुन फड,श्रीकांत दराडे आकुर्डी, सत्यजित जाधव मोहननगर , अनिल मास्करी ,शौकतअली, कादर शेख, अहमद खान, यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला .
यावेळी आप नेते डॉक्टर अनिल रॉय, आप पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे, आप महिला नेत्या सिताताई केंद्रे , डॉक्टर अमर डोंगरे, आप सफाई कामगार संघटना अध्यक्ष किसन चावरिया, कमलेश रणवरे, सुरेश बावनकर, वैशाली महाळंगी, सुनील शिवशरण, ब्रह्मानंद जाधव,स्वप्निल जेवले, पांडुरंग फुंदे सरेवेश देशमुख, संदेश शिंदे, पांडुरंग काळे, सत्यजित काळे, वाजीद शेख,सुरेश कांबळे, अनिल टकले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी के.टी बारापात्रे यांनी बोलताना सांगितले निगडी प्राधिकरण मध्ये सर्व सुशिक्षित मतदार आहे आणि तो सर्व आम आदमी पार्टीला मानणारा प्रवर्ग आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा आम आदमी पार्टीला फायदा होईल असे त्यांनी म्हटले.
Discussion about this post