व्हीएसआरएस मराठी न्युज -ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांवर पिंपरी चिंचवड अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये पथकाने ०३ पिडीत महिलांची सुटका केली आहे. सोमवार (ता.२१) रोजी हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत पथकाने हि कारवाई केली आहे.
या कारवाई मध्ये पथकाने ०३ पिडीत महिलांची सुटका केली आहे. सोमवार (ता. २१) रोजी हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत पथकाने हि कारवाई केली आहे.
१) रॉकी उर्फ ऋषीकेश शिरीष कदम (वय ३० – वर्ष, रा. ८८३ वडारवाडी, हनुमान कॉर्नर, मॉडेल कॉलनी, फर्ग्युसन रोड, पुणे, ‘मुळगाव. सातारा) आणि त्याची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्या दलालांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची माहिती काढुन कारवाई करण्याच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाचे पथक गोपणीय माहिती काढत असताना माहिती मिळाली की, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दित स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही दलाल अवैधरित्या पिडीत महिलांकडुन जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत.
या दलालांची नावे सेहल आणि पती रॉकी अशी आहेत. हे दलाल पती-पत्री ग्राहकांना मोबाईल वरुन कॉल व व्हॉटस्अॅप कॉल करून महिलांचे फोटो पाठवत होते. तसेच निवड झालेल्या महिलेला वेगवेगळ्या हटिल्स व लॉज वर स्वतः घेवुन जात होतेआणि त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत होते.
पथकाने छापा दरम्यान दलाल महिला नेहल हिच्या ताब्यात ०४ हजार रुपयांची रोख रक्कम, ६० रुपयांचे इतर साहित्य आणि १२ हजार किमतीचा एक मोबाईल फोन असा एकुण १६ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. भादवी कलम ३७०, सह अनैतिक व्यापार ३४ प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४,५ प्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
वेश्या गमनासाठी
ग्राहकांकडुन एका वेळचे ०३ हजार ते ०४ हजार रुपये घेत होते. पिडीत महिलांच्या हातावर मात्र, केवळ १२०० रुपये टेकवत होते. तसेच एका रात्रीचे या महिलासाठी १२ हजार रुपये हे दलाल घेत होते तर महिलांना फक्त ०३ हजार रुपये देवून त्यांच्याकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेत होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उप- निरीक्षक धैर्यशील सोळंके, उप-निरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार कल्याण महानोर, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
Discussion about this post