व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातील शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्या विनय निकेतन शाळेतील ७५० विद्यार्थ्यांची, तर पिंपळे निलख गावातील महापालिका शाळा क्र.५२ शाळेतील ३५० विद्यार्थ्यांची तसेच शाळेतील शिक्षकांची तज्ञांद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे आणि विजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबीरात सुमारे ७०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व्हावी. त्यासाठी शाळा प्रशासन किंवा पालकांना कोणताही खर्च होवू नये. याकरिता आम्ही काही कंपनींच्या सहयोगातून मोफत हा उपक्रम घेतला आहे. त्याला परिसरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शहरातील सर्वच महापालिका शाळांमध्ये असा उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. – संकेत चोंधे, शहराध्यक्ष, भाजपा, युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.
Discussion about this post