व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (दि.२६) रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांनी जगताप कुटुंबाचे सांत्वन केले.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी सांत्वन केले. गुरूवारी सायंकाळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचनताई गडकरी यांनी जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Discussion about this post