तळवडे | (व्हीएसआरएस मराठी न्युज) | तळवडे या रेड झोन भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडे दाखल झाल्यामुळे रेड झोन मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील ह्यांनी फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम भवरे ह्यांना कारवाई करण्यात यावी म्हणून आदेश दिले आहेत ज्या वेळी रेड झोन क्षेत्र परिसरात बेकायदेशीर बांधकाम सुरू होते त्या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम बीट मार्शल तसेच बांधकाम अधिकारी ह्यांनी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई केली नाही.
त्यावेळी आर्थिक देवाण घेवाण करून बेकादेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ दिले आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्याचा बडगा उगारत आहे. दुसरीकडे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग अधिकारी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अतिक्रमण अधिकारी ह्यांनी रेड झोन मधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी लाखो रुपये संबंधित बेकादेशीर बांधकाम करणारे नागरिक ह्यांच्या कडून उकळले आहे तिवेणी नगर तळवडे चिखली रुपी नगर पाटिल नगर ह्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम खरेदी विक्री व्यवहार खुप मोठ्या प्रमाणावर झाले असून त्या बेकायदेशीर बांधकाम खरेदी विक्री व्यवहार नोंद पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन करसंकलन विभाग अधिकारी ह्यांनी प्रत्येक गुंठा जागेसाठी एक ते दोन लाख रुपये बेकायदेशीर बांधकाम नोंद करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका करसंकलन अधिकारी व कर्मचारी ह्यांनी उकळले असून सदर प्रकरण अंगलट आले असून नागरिकांना वेठीस धरून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी जाणूनबुजून दिले असून प्रदिप जांभळे पाटील ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करत असून सदर तळवडे येथील रेड झोन बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई रद्द करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना वेठीस धरू नये बेकायदेशीर बांधकाम सुरू होते.
त्या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना बीट मार्शल व बांधकाम परवाना अधिकारी ह्यांनी लाखो रुपये बेकायदेशीर बांधकाम धारक ह्यांच्या कडून घेऊन बेकायदेशीर बांधकाम नोंद पिंपरी चिंचवड महानगरपालिका करसंकलन कार्यालय चिखली विभाग ह्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हटीतील इतर ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अतिक्रमण कारवाई करत नाही आणि तळवडे येथील रेडझोनमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी फक्त अतिक्रमण कारवाई करण्यात यावी म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी आदेश दिले ही गोष्ट हास्यपद असून त्या संदर्भात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते
Discussion about this post