पुणे | औंध परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. आयटी इंजिनिअर (IT Engineer) असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या 8 वर्षांच्या लहान मुलासह पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. सुदिप्तो गांगुली (वय 44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना घडून 24 तास उलटले तरी आत्महत्येचं गूढ कायम आहे.
सुप्दितो गांगुली हा एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीस होता. त्याने पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबियांची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये प्रियंका सुदिप्तो गांगुली (४०), मुलगा तनिष्क गांगुली (८) आणि सुदिप्तो गांगुली (४४) अशी मृतांची नावे आहेत.
सुप्दितो गांगुली आयटी इंजिनिअरने आधी पत्नीचा पॉलिथीन पिशवी डोक्यात अडकवून गळा दाबून खून केला. त्यानंतर आठ वर्षांच्या मुलालाही त्याने जिवे मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक घडला.
मूळचे पश्चिम बंगालचे
गांगुली कुटुंबीय मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. गेल्या १७ वर्षांपासून कामानिमित्त ते पुण्यात वास्तव्यास होते. हिंजवडी परिसरातील नामांकित टीसीएस कंपनीत सुप्दितो याला चांगल्या पगाराची नोकरी होती.
24 तासानंतरही गूढ कायम
औंध परिसरात झालेल्या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील तिघांचा यामध्ये मृत्यू झाल्याने एकच चर्चा सुरु आहे. पण या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून, गूढ अद्याप कायम आहे.
Discussion about this post