व्हीएसआरएस मराठी न्युज – मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव रोजा साजरा करत आहेत.या महिन्यात मुस्लिम समाज बांधव इतर समाजातील लोकांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण देत असतात.यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य भावना वाढते.
पवित्र रमजान महीन्यात धनंजय भालेकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी मध्ये मा आमदार विलास लांडे सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन शनिवारीरी सायंकाळी करण्यात आले होते. त्यावेळी विविध मान्यवर यांच्या उपस्थिती इफ्तार करण्यात आले.
Discussion about this post