व्हीएसआरएस मराठी न्युज –
भक्ती शक्ती समूह शिल्पा लगतच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत होता. या जागेबाबत अत्यंत षडयंत्रपूर्वक पीएमआरडीए प्रशासन व काही बांधकाम व्यवसायिकांनी संगणमत करून लिलाव करून खरेदी विक्री व्यवहार केला आहे.या जागेत संबंधित बिल्डरांनी काम सुरू केले आहे. या जागेबाबत आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दि.७/४/२०२३ रोजी ६.०० वाजता भक्ती शक्ती शिल्पसमूहा समोर बैठक झाली. या बैठकीत सोमवार दि.१०/४/२०२३रोजी पीएमआरडीए कार्यालय समोर सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत “काळी रिबीन बांधून प्रशासनाचा निषेध”व्यक्त करणारे सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने *”धरणे आंदोलन”* होणार आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या..!*
१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पी एम आर डी ए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.
२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पी एम आर डी ए ने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.
३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.
४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.
५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा.
६) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” (कुस्त्या,तमाशा) आदि कार्यक्रम याच जागेत व्हावेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. आसे आवाहन समितीच्या वतिने करण्यात आले आहे.
Discussion about this post