व्हीएसआरएस मराठी न्युज –आकुर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नाल्यामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणात बजेट तरतूद करण्यात येते. मात्र मात्र आरोग्य विभागाकडून याचे योग्य नियोजन केले जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
आकुर्डी परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची जर अशी दुरावस्था असेल तर शहरातील इतर नाल्यांची काय परिस्थिती असेल हे न उलगडणारे कोडे म्हणावे लागेल. अवघ्या दोन महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे.
जर अशाप्रकारे नाल्यांमध्ये राडाराडा पडलेला असेल तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. हे शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे महापालिकेने यापुढे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद
करून स्वच्छ व सुंदर शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे इखलास सय्यद यांनी सांगितले.
कालच्या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा होऊन नाले साफसफाई ची मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहे. पुढील सात दिवसांमध्ये आकुर्डी परिसरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कळवले आहे.
Discussion about this post