व्हीएसआरएस मराठी न्युज -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाइन लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर झाले असून, संबंधित बालकांच्या पालकांना त्याबाबत ‘एसएमएस’ही पाठविण्यात आले आहेत.
आरटीई’ प्रवेशासाठी राज्यातील 8 हजार 828 शाळांनी नोंदणी केली आहे. यात 1 लाख 1 हजार 969 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या होत्या. यासाठी 3 लाख 64 हजार 390 ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. प्रवेश जाहीर झालेल्या पालकांनी 13 ते 15 एप्रिलपर्यंत पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पडताळणी समितीने कागदपत्रे पात्र ठरविलेल्या बालकांचे प्रत्यक्ष शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात 15 हजार 596 प्रवेशाच्या जागा असताना 15 हजार 501 बालकांनाच प्रवेश जाहीर झालेला आहे. राज्याच्या प्रतीक्षा यादीत 81,129 बालकांचा समावेश झाला आहे. निवड यादीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील पालकांना प्रवेशाबाबत “एसएमएस’ पाठविण्यात येणार आहेत.
Discussion about this post