व्हीएसआरएस मराठी न्युज –काँग्रेस हाच सर्व समाज घटकांचा विचार करणारा व सर्व समाज घटकाला संधी देणारा पक्ष आहे. प्रत्येक समाज घटकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे यासाठीच सेल व विविध विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा.
काँग्रेसच्या विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. आदिवासी, भटके विमुक्त, दिव्यांग, संघटीत, असंघटीत कामगार, सहकार, विधी, डॉक्टर, इंजिनिअर, कृषी विभाग व समाज घटकांचे सेल स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात आज विविध घटकांचे ३९ सेल कार्यरत आहेत. सेलच्या पदाधिकाऱ्यांचे जाळे राज्यभर आहे, हे सेल व विभाग काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. तुम्हाला काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे, या संधीचे सोने करा. लोकांपर्यंत जा, त्यांच्या समस्या समजून घ्या व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा.देशात व राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. चांगले काम करा राज्यात व देशात काँग्रेसची पुन्हा विजयी पताका फडकेल.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी मंत्री व सेल व विभागचे प्रभारी सुनिल देशमुख यांनी केली, सुत्रसंचालन समीर वर्तक यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी केले.
Discussion about this post