व्हीएसआरएस मराठी न्युज –जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 पासून 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे.
हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.
Discussion about this post