व्हीएसआरएस मराठी न्युज –1 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बीएसएफ जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सीमेवर बीएसएफ जवान तैनात असतात त्यांच्यावर सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी असते.
बीएसएफ ची स्थापना 1965 मध्ये झाली होती. राजस्थान च्या वाळवंटापासून हिमालयाच्या बर्फाच्छादित भागामध्ये बीएसएफ जवान तैनात असतात. स्मगलिंग पासून अगदी क्रॉस बॉर्डर घुसखोरी देखील रोखण्याची जबाबदारी आहे. सीमा सुरक्षा दल हा जगातील सर्वात मोठे सुरक्षा दल आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे दल कार्यरत असते
आता सुरक्षा दलात काळानारूप अनेक बदल झाले आहेत. यामध्ये तांत्रिक आणि आधुनिक बदल होत गेले. आज हे दल सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह आधुनिक शस्त्रांस्त्रांसह कार्यरत आहे. या सेवांचा सीमेच्या रक्षणासाठी फार उपयोग होतो. या BSF दलाला आणि देशाची त्यांच्या अमूल्य योगदानाला व्हीएसआरएस न्युजचा सलाम!
Discussion about this post