Pune News : पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना ताप आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्षे आहे.त्या २००७ ते २०१२ या कालावधीत राष्ट्रपती होत्या. त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
Discussion about this post