व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जीम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत.
परवानगी देत असतांना एसओपी काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जिम फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेच्या प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून संवाद साधला.
VSRS NEWS MARATHI PCMC