व्हीएसआरएस न्युज पिंपरी (अक्रम शेख) साद सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
अंध कुटुंबीयांना फराळ वाटप सोमवार दि.1.11.2021 रोजी सायं.6 वा.स्थळ :- खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन हॉल, खंडोबा माळ,आकुर्डी, पुणे 44.
कार्यक्रम प्रमुख उपस्थिती,
पोलीस आयुक्त पिं.चिं. मा.श्रीकृष्णप्रकाश सर.
पोलीस उपायुक्त पिं.चिं.मा.श्री.मंचक इप्पर सर.
सदर नियोजित कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी केवळ मर्यादित सदस्यांमध्ये करण्यात येईल.
डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने लुटावा. उद्धवसाहेबांनी नागरिकांसाठी राबविलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, नागरिकांनी कोरोनापासून दूर रहावे व कमी प्रमाणात फटाके वाजवून प्रदूषण रोखावे. शहरवासियांनी कोरोनाचा अंधकाररुपी राक्षस संपविण्यासाठी जास्तीत जास्त दीप प्रज्वलन करून, शहर प्रकाशप्रमाणे तेजोमय करावे, असे प्रतिपादन कामगार नेते इरफानभाई सय्यद अध्यक्ष साद सोशल फाउंडेशन यांनी केले.
साद सोशल फांडेशनच्यावतीने सोमवार पिंपरी चिंचवड शहरातील अंध बांधवांच्या कुटुंबीयांसाठी आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अंध’ बांधव व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येणार असुण. अंध बांधवांच्या दिवाळीत प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
Discussion about this post