व्हीएसआरएस न्युज पिंपरी पुणे – सालाबादप्रमाणे दिवाळीला पाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांना बारामती येथे शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजाच्या विविध स्तरातील अनेक लोक आवर्जून येत असतात.
यंदा कोरोनाची स्थिती विचारात घेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे या उद्देशाने समस्त पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्रवारी ५ नोव्हेंबर) साहेबांच्या गोविंदबाग या निवासस्थानाऐवजी लगतच असलेल्या डॉ.अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये लोकांना भेटणार आहेत.
कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नसल्याने भेटीसाठी येताना प्रत्येकाने व्यवस्थित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत, सॅनेटायझरचा वापर करावा असे आवाहन याठिकाणी करण्यात आले आहे.
Discussion about this post