व्हीएसआरएस मराठी न्युज दिल्ली-संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात इंधनावर दिलेल्या अतिरिक्त अनुदानामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काही काळ तरी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करणे शक्य नाही असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
त्या म्हणाल्या की संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्याकाळात इंधनाचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांना कर्जरोखे पुरविले होते. कर्जरोख्यावरील व्याज चालू आहे. गेल्या पाच वर्षात त्यासाठी केंद्र सरकारने 60 हजार कोटी रुपये दिले आहेत.
त्याचबरोबर आणखी 1.30 लाख कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जर या कर्जरोख्यांचे ओझे नसते तर उत्पादन शुल्क कमी करण्याची शक्यता होती असे सीतारामन म्हणाल्या.
Discussion about this post