व्हीएसआरएस न्युज रामरती देवी (वय ९२) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
गेल्या वर्षी मायावती यांचे वडील प्रभूदयाल यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले होते. दिल्लीत ३, त्यागराज मार्ग या ठिकाणी मायावती यांचे घर आहे. तेथे जाऊन प्रियांका यांनी मायावती यांच्याशी संवाद साधला. प्रियांका यांनी या भेटीचा व्हिडिओही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन असेही त्यांनी भेटीच्या शेवटी सांगितले. राज्यसभेचे खासदार दिपेंदर हुडा हे सुद्धा प्रियांका यांच्यासह उपस्थित होते.
रामरती यांच्या निधनाची वार्ता आल्यानंतर प्रियांका यांनी शनिवारी ट्विट केले होते. देवाने त्यांना आपल्या जवळ स्थान द्यावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे असे प्रियांका यांनी म्हटले होते.
Discussion about this post