व्हीएसआरएस न्युज पिंपरी शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आणि लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेने आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण सुरु केले आहे.
लसीबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता शहरातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेने आता गृहनिर्माण सोसायट्या, घरोघरी, चाळीच्या ठिकाणी जाऊन लसीकरण सुरु केले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिका-यांनी नियोजन करुन घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे डॉ. गोफणे यांनी सांगितले. लसीकरण केंद्रांच्या वेळेमध्ये देखील वाढ केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरु असतात.
Discussion about this post