व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता हैराण असतानाच काल जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली. या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज आणि उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीत आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराच जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.
‘जगावं की मरावं’ असा प्रश्न हॅम्लेटच्या नाटकात विचारला होता.
अचानकपणे सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवले. 20 दिवसाला 809 रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post