व्हीएसआरएस मराठी न्युज –सकाळी खारकोपर स्थानकाजवळ एक अपघात झाला आहे. बेलापूर कडून खारकोपरला जाणार्या मुंबई लोकलचे 3 डब्बे रूळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पण बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक सध्या बंद आहे.
Discussion about this post