व्हीएसआरएस मराठी न्युज –मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ओबान नावाचा चित्ता बाहेर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी एक ओबान चित्ता कुनो राष्ट्रीय उद्यानापासून 20 किमी अंतरावर असलेल्या विजयपूरच्या झार बडोदा गावात गेला आहे. त्यामुळे वनविभागाची रेस्क्यू टीमही त्याचा शोध घेण्यासाठी झार बडोदा गावात पोहोचली असल्याची माहिती डीएफओ यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशच्या (मध्य प्रदेश) श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून ‘ओबान’ नर चित्ता अचानक बेपत्ता झालाय. त्याच्या तपासासाठी वन विभागाची चार पथके कार्यरत आहेत. कुनो नॅशनल पार्कचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, लोकेशन ट्रेसनुसार चित्ता गावाच्या आजूबाजूच्या शेतात बसला आहे. त्याला कुनो नॅशनल पार्कमध्ये परत आणण्यासाठी एक टीम त्याच्या मागावर आहे.
Discussion about this post