व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –सोमवारपासून (19 डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे. सत्ताबदल झाल्यानंतर विरोधी बाकावर बसायला लागलेल्या महाविकास आघाडीचे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील हे पहिलेच मोठे शक्ती प्रदर्शन असणार आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी केली असून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत.
‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद
- मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
- भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड
- नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड
Discussion about this post