व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे वाढलेले पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.
आज पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. यानुसार मुंबईत पेट्रोलसाठी 114.98 रुपये एका लिटरसाठी मोजावे लागतील. याचप्रमाणे डिझेलसाठी 99.19 रुपये द्यावे लागतील. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचले आहे.
गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागले आहे.
कोलकात्यात आज पेट्रोलचा दर 108.01 रुपये प्रति लिटरवरून 108.53 रुपयांवर पोहोचले आहेत. तर कोलकात्यात डिझेल 93.57 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर, आज एक लिटर पेट्रोल 104.43 रुपये प्रति लिटरवरून 104.90 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल 95.00 रुपये प्रति लिटरने मिळत आहे.
Discussion about this post