व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कंपनीत अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पत्रा शेड ची काही घरांना त्याच्या झळा बसून मोठे नुकसान झाले.
बीना शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळतात विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र अग्निशामक दल पोलीस आणि महापालिका अधिकारी यांच्याकडून दिलासा दिला जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
तसेच काल रात्री पुण्यातील धायरीत मेणबत्ती कारखान्याला भीषण आग लागल्याचं वृत्त मिळालं आहे. या भीषण अग्निकांडात कारखान्यातील मालाचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Discussion about this post